Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंगणापूर -नातेपुते घाट रस्ता खुला झाल्याने गैरसोय दूर

शिंगणापूर नातेपुते  भवानी घाट वहातुकीसाठी खुला.
छायाचित्र --दीपकराव तंडेबडवे, शिखर शिंगणापूर

रुंदीकरण काम सुरु असल्याने घाटातून शिस्तीने जाण्याच्या सूचना.

शिखरशिंगणापूर: सातारा, सोलापूर, पुणे, सांगली या  महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यानां जोडणारा हा महामार्ग आहे. सोलापूर जिल्हा बांधकाम विभागाने या रस्त्याची  दखल घेऊन शिंगणापूर भवानी घाट रस्ता रुंदी करणाचे काम हाती घेतले. 22 जुलै ते 23आगस्ट सुमारे 1 महिना हा रस्ता वहातूकीं बंद होता. काल पासून हा रस्ता वहातुकी साठी खुला झाल्याने, शिंगणापूर, परिसरातील रुग्ण, शेतकरी, व्यवसाईक, वं दुरुस्थ भाविक भक्त यांची गैरसोय दूर झाली आहे. तरी पण घाट रस्ता रुंदी करणं काम सुरु असल्याने भवानी घाटातून, वेग मर्यादा कमी ठेऊन,वाहकांनी वाहने सावकाश हाकावीत अशा सूचना सोलापूर सा बां विभागाने दिल्या आहेत.
      समुद्र सपाटी पासून सुमारे 10,050 मीटर उंची असलेल्या कडक डोंगरातून भवानी घाट रस्ता आहे. लातूर, परभणी, नांदेड, पंढरपूर शिंगणापूर अशी मराठवाड्यातून  तीर्थक्षेत्र असल्याने इथे वहतूक असते. तर अहमदनगर, बारामती, मिरज, सांगली अशी व्यापारी शेतमाल वहतूक सुरु असते. सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या परवानगी मुळे सुमारे एक महिना हा घाट रस्ता बंद करण्यात आला होता. पर्यायी वळण वहातुकी मुळे 13 किमी साठी 32 किमी अंतर तोडावे लागत होते. इंधन, वेळ, पैसा या मुळे सर्वजण त्रस्त होते. आज एक बाजूने का होईना रस्ता खुला झाल्याने वाहन धारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रा नुसार वेळेत, अवघड घाट रस्ता काम पूर्ण केल्याने सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभाग वं संमधीत ठेकेदार कंपनीला धन्यवाद देताहेत.
सार्वजनिक बांधकाम सोलापुर विभागाच्या अख्त्यारीत हा भवानी घाट रस्ता येत आहे वरिष्ठनंच्यां मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यापूर्वी रस्ता पूर्ण करून भाविकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. अद्याप अवघड भवानी घाटाचे दुरुस्ती काम सुरु रहाणार आहे. वाहनधारकांनी घाटातून शिस्तीत वहाननें हाकून सहकार्य करावे.असे आवाहन श्रीमती सुनीता पाटील सार्वजनिक बांधकाम सोलापूर  यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments