Hot Posts

6/recent/ticker-posts

शामगाव घाटात चालकाला मारहाण करत सात लाखांची लूट

बोलेरो गाडीसह चेन, मोबाईल लंपास

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
उंब्रज: 
शामगाव घाटातून प्रवास करणारे बोलेरो वाहन आडवून चालकाला मारहाण करत अज्ञात चार इसमांनी तब्बल सात लाखांची लूट केली. शनिवारी दि. 9 रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. वाहनाची शोधाशोध करून शनिवारी दुपारी यासंदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी अमीन दाऊद वडगावकर (वय 23, रा. सन्नके पिठाच्या गिरणीजवळ, समतानगर, मिरज) हे शामगाव गावच्या हद्दीत शामगावच्या घाटातून कराडच्या दिशेने बोलेरो गाडीतून निघाले असताना दोन चारचाकी वाहनातून आलेल्या चौघा अनोळखी इसमांनी त्यांचे वाहन वडगावकर यांच्या गाडीला आडवे मारले. वडगावकर यांनी गाडी थांबवताच त्यांना चौघांनी गाडीतून जबरदस्तीने खाली ओढून त्यातील एका पोलो चारचाकी गाडीत बसवून एका शेतात नेले. त्याठिकाणी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांची 60 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्यांची चेन व खिशातील 27 हजारांची रोकड व 30 हजार रुपये किंमतीचा आयफोन काढून पोबारा केला. जाताना चोरट्यांनी त्यांची 6 लाख रुपये किंमतीची बोलेरो गाडीही चोरट्यांनी पळवून नेली.  घाबरलेल्या अवस्थेत तेथून वडगावकर कसेबसे तेथून घरी गेले. त्यानंतर वाहनाचा शोध घेऊन त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
घटनास्थळी उपअधीक्षक ठाकूर यांनी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. तपास उपनिरीक्षक महेश पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments