सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण:- मौजे जिंती ता फलटण येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूमच्या कपाटातील ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबतची फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनूसार, मौजे जिंती गावातील कार्पोरेशन बंगला येथे राहणारे मेडिकल व्यावसायिक आदित्य अशोक रणवरे हे कुटुंबीयांसमवेत रविवारी सकाळी ११ वाजता तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एका बेडरूम मधील कपाटातील ३५ तोळ्याचे व दुसऱ्या बेडरूम मधून १५ तोळे सोन्याचे दागिने असे एकूण ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. सोमवारी सकाळी ७.३० वाजता रणवरे कुटुंबीय तुळजापूर मध्ये असताना त्यांना नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडल्याची माहिती दूरध्वनीवरून सांगितली माघारी आल्यानंतर घरातील ५० तोळे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलिसांनी यांनी भेट देऊन सातारहून डॉग स्कॉड बोलावून घेतले होते जिंतीतील भर वस्तीत झालेल्या घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.
0 Comments