Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणला बुधवार पासून मराठा क्रांतीचे साखळी उपोषण


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
फलटण
-मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तहसील कार्यालया बाहेर साखळी उपोषण करण्याचा निर्णय सकल मराठा समाज फलटण तालुका यांच्यावतीने घेण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चा फलटण त्यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, फलटण येथे मराठा समन्वयकांची बैठक संपन्न झाली. यामध्ये मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू केले असून सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ २४ ऑक्टोबरला संपत असून, त्यांनी आरक्षण न दिल्यास शांततेच्या मार्गाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, साखळी उपोषण, कॅन्डल मार्च काढणे अशी आंदोलनाची दिशा त्यांनी ठरवून दिली आहे. त्याला पाठिंबा म्हणून फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने फलटण तालुक्यात गाव पातळीवर साखळी उपोषण न करता फलटण तहसील कार्यालयाबाहेर एकाच ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता साखळी उपोषणास सुरुवात होणार असून फलटण तालुक्यातील सर्व मराठा समाजाने या साखळी उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments