Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरावके वस्तीनजीक हल्ला करून दुचाकीस्वारास लुटले भरदिवसा सहा दरोडेखोरांकडून 95 हजारांचा ऐवज लंपास



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण :
येथील बोरावके वस्तीनजीक दुचाकीवरून निघालेल्या युवा व्यावसायिक दुचाकीस्वारावर हल्ला करुन 95 हजारांचा दरोडा टाकणार्‍या सहा दरोडेखोरांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी 11 रोजी ही घटना घडली होती. जखमीच्या दवाखान्यातील जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय पोपट टिळेकर (वय 28, रा. माळेगाव, ता. बारामती) या ज्वेल परफ्युम गॅलरी चालक व्यावसायिकाने फिर्याद दिली. दि. 11 रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अक्षय दुचाकीवरून बोरावके वस्ती येथून जात असताना त्यांच्या मागून एक दुचाकी आली. त्या दुचाकीवरील अज्ञात इसमाने अक्षय यांच्या डोक्यात लोखंडी रॉडचा प्रहार केला. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून अक्षय ुचाकीसह खाली पडले. त्यानंतर पाठीमागून अन्य दोन दुचाकी आल्या. तिन्ही दुचाकीवरील सर्व सहा अनोळखी दरोडेखोरांनी लोंखडी रॉड, लाकडी दांडक्याने अक्षय यांना मारहाण करून जखमी केले व त्यानंतर त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची इक सोन्याची चेन व डाव्या करंगळी शेजारील बोटातील अर्धा तोळे वजनाची 25 हजारांची अंगठी व 20 हजार रुपयांचा मोबाईल, असा 95 हजार रुपयांचा ऐवज काढून घेत पलायन केले.
जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या जबाबावरून शहर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद झाली. उपअधीक्षक राहूल धस यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. तपास उपनिरीक्षक दातीर करत आहेत.

Post a Comment

0 Comments