Hot Posts

6/recent/ticker-posts

दोन लाखांच्या खंडणीसाठी गुटखा व्यापार्‍याकडून जीवे मारण्याची धमकी, आत्मदहन करण्याचा व्यावसायिकाचा इशारा

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा :
  येथील रविवार पेठेत गुटख्याचा मोठा व्यापार सुरु असून व्यापारी साहील कोलकर, त्याचा भाऊ सलीम कोलकर व आई क्षमाप्पा यांनी गुटखा विक्री करणार नसशील तर दोन लाखांची खडणी दे अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सदरबझार येथील डागा दाम्पत्याने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या दाम्पत्याला कोलकर कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात रविवार पेठेतील दुकानासमोर बोलावून घेत मारहाणही केली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी प्रवीण फडतरे यांच्याकडून गुटखा विक्रेत्या व्यापार्‍याची पाठराखण केली जात असल्याचा आरोपही डागा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गुन्हा दाखल न झाल्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.
निवेदनातील माहितीनुसार सदरबझार येथील प्रकाश डागा यांचा सदरबझारमध्ये हॉटेल व पानपट्टी व्यवसाय आहे. तेथे गुटखा विक्रीसाठी ठेवण्यासाठी कोलकर यांनी पैसे देण्याचे अमिष दाखवून दबाव टाकला. मात्र, डागा दाम्पत्याने त्यास नकार दिल्याने त्यांना बोलावून कोलकर यांनी दोन लाखांच्या खंडणीची मागणी करत मारहाण केली. शिवाय माझे सर्व पोलीस अधिकार्‍यांसोबत देण्या-घेण्याचे संबंध असून तू माझे काहीही वाकडे करु शकत नाही. माझ्या संपर्कात अनेक गुन्हेगार असून तुमच्या सर्व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी कोलकर यांनी दिली. याबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी डागा कुटुंबीय शहर पोलीस ठाण्यात गेले होते. तेथे अदखलपात्र तक्रार घेण्यात आली. त्यासाठी एलसीबीच्या प्रवीण फडतरे यांनी दबाव टाकला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असेही फडतरे यांनी शहर पोलिसांना सांगितले. मात्र, ठाणेदारांनी एनसी दाखल करुन घेतली.
अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा शुक्रवारी 20 रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा लक्ष्मी प्रकाश डागा यांनी दिलेल्या पत्रातून दिला आहे.

Post a Comment

0 Comments