Ticker

6/recent/ticker-posts

फलटणला ग्रामपंचायत निवडणुकीत फिफ्टी फिफ्टी






सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
फलटण- फलटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायती च्या तर ३ पोटनिवङणूकांची मतमोजणी आज शांततेत पार पडली. यामध्ये दोन ग्रामपंचायती आणि ३ पोटनिवङणूका मध्ये राष्ट्रवादी प्रणित राजेगटाने आपले यांचं वर्चस्व कायम राखले असल्याचं स्पष्ट झालं असून २ ग्रामपंचायती भाजप प्रणित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाने खेचून आणल्या आहेत. सावंतवाङी येथे ईश्वर चिट्टीद्वारे एक महिला सदस्य पदी निवङून आली आहे.
 आज फलटण येथील शासकिय गोङावून मध्ये सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला पोटनिवङणूकांचे निकाल घोषित करण्यात आले .सासकल ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र घोरपडे , मुरूम ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत प्रतीक्षा झेंङे तर , मलवडी ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत सुनीता तरडे विजयी झाल्या जाधवनगर ग्रामपंचायतींच्या निवडणूकी मध्ये संगीता जाधव यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून निवङून आल्या असून एका जागेसाठी झालेल्या निवङणूकीत अमोल जाधव हे निवङून आलेले आहेत. येथील ६ सदस्य बिनविरोध निवङून आलेले आहेत .
सावंतवाडी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शकुंतला सावंत या लोकनियुक्त सरपंचाने म्हणून निवङून आलेल्या असून विशाल फडतरे , किशोरी चव्हाण , नंदा जाधव , गणपत सावंत , शकुंतला बिचुकले, तानाजी जाधव , अर्चना मदने व अनिता मदने यांना समान मते पङल्यामुळे चिठ्ठी द्वारे अनिता मदने या निवङून आल्या .
दर्याचीवाडी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज आलेला नसल्यामुळे सरपंच पदाची निवङणूक स्थगित राहिली आहे.ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदासाठी संपूर्ण दर्याचीवाङी येथे एकही ओबीसी नसल्यामुळे सरपंच पदाची निवङणूक स्थगित राहीली आहे. नितीन जाधव , शिल्पा कदम , प्रतिभा पवार , रघुनाथ जाधव , अंजना जाधव , गोरख कुमकाले , मेघा ढेम्बरे हे सदस्य म्हणून निवङून आलेले आहेत. उपळवे ग्रामपंचायती च्या निवङणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून विक्रम गोरख लंभाते , तर श्रीकांत श्रीमंत लंभाते , माया अजित लंभाते , शितल रोहन लंभाते , चंद्रशेखर सुभाष लंभाते , माधुरी सचिन जगताप आणि खंङेराव संपत मदने हे सदस्य म्हणून निवङून आलेले आहेत.उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांनी गुलाल टाकून आणि फटाके फोङून आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर आपापल्या नेत्यांच्या घरी जावून आशिर्वाद घेतले .पोलीस बंदोबस्त चोख होता.

Post a Comment

0 Comments