आजचा दिवस सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४, - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, November 4, 2024

आजचा दिवस सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४,

सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४, शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, कार्तिक शुक्ल तृतीया, चंद्र - वृश्चिक राशीत, नक्षत्र - अनुराधा स. ८ वा. ०४ मि. पर्यंत नंतर ज्येष्ठा,  सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४२ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०३ मि. 
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आजचा दिवस स. ८ पर्यंत चांगला दिवस आहे. आज रवि -शनि त्रिकोणयोग, चंद्र - गुरु प्रतियोग, चंद्र - शुक्र युतीयोग व चंद्र - शनि केंद्रयोग होत आहे.  आजचा दिवस वृषभ, कर्क,सिंह, कन्या, तुला वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, मिथुन व धनु या राशींच्या व्यक्तींना प्रतिकूल जाईल. 

दैनंदिन राशिभविष्य                                                            

मेष  : मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. तुमच्यावर कोणतेतरी भावनिक दडपण राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.
वृषभ : मनोबल उत्तम राहील. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. 
मिथुन : अकारण एखाद्या कामात आपल्याला आज मनस्ताप संभवतो. कामाचा ताण व दगदग जाणवेल. आज आपले मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. 
कर्क : संततीसौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. बौद्धिक कामात आपल्याला विशेष प्राविण्य मिळेल. 
सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्यावर असणारी जबाबदारी तुम्ही योग्य रीतीने पार पाडणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. 
कन्या : दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. कामाचा ताण असला तरी मनोबलाच्या जोरावर तुम्ही आपली सर्व कामे पूर्ण करणार आहात. 
तुळ : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक जीवनात आंनददायी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. काहींना आज अनपेक्षितपणे धनलाभ संभवतो. आर्थिक कामे होतील. 
वृश्‍चिक : गेले दोन दिवस आपल्यावर असणारा मानसिक ताण आज कमी होईल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आनंदी रहाल. आपली आजची दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. 
धनु  : मानसिक कुचंबणा होईल. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी संभवतात. प्रवास शक्यतो टाळावेत. आज आपण वादविवादात सहभाग टाळावा. 
मकर : आर्थिक लाभ होतील. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. अनपेक्षितपणे जुने मित्र मैत्रिणी भेटतील. व्यवसायातील तुमचेअंदाज अचूक ठरणार आहेत.  
कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
मीन : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यावर असणारा मानसिक ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढेल.                                                                                                  
आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क
साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४

No comments:

Post a Comment