पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वच्छतागृह दरावाजाच्या प्रतिक्षेत... - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, January 10, 2025

पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वच्छतागृह दरावाजाच्या प्रतिक्षेत...

प्रतिनिधी  समद आत्तार 
पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे परिसरातील नागरिकांना शासकीय मोफत वैद्यकीय देण्यासाठी जिवनदायी ठरलेली धमन्यांपैकी महत्वाची धमनी समजली जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्ती करीता शासनाने निधी दिला आणि दुरूस्तीचे कामही सुरू झाले. सुमारे चार ते पाच महिन्यांपासून येथील स्वच्छतागृह दरावाजाच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळेच उपचार घेण्यासाठी येणारे रूग्ण आणि त्याची जबाबदारी असणारे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना स्वच्छतागृहाचा वापर करणे मुश्किल झाले आहे. होत असलेल्या गैरसोयीमुळे अधिकारींसह रूग्णांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. परंतू याचा किंचीतही फरक संबंधित ठेकेदाराला पडत नसल्याचे दिसून येते. अजूनही किती काळ असाच जाणार? कि संबंधित वरिष्ठ अधिकारी यात लक्ष घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment