औंधमध्ये आज उडणार धुरळा, यमाई केसरी किताबाचा कोण होणार मानकरी? - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, January 22, 2025

औंधमध्ये आज उडणार धुरळा, यमाई केसरी किताबाचा कोण होणार मानकरी?


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
औंध:  येथे सुरू असलेल्याश्री यमाई देवी यात्रोत्सवानिमित आज बालगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. मानाची यमाई केसरी बैलगाडी शर्यत खरशिंगे रोड, सरकारी मळा येथील मैदानात सकाळी ८ वाजता सुरू होईल. बैलगाडा शौकिनांना ही शर्यत युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून सुद्धा पाहता येणार आहे. 
   शर्यतीमधील प्रथम ७ क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडी मालकांना अनुक्रमे १ लाख रुपये, ७१ हजार रुपये, ५१ हजार रुपये, ४१ हजार रुपये, ३१ हजार रुपये, २१ हजार रुपये, ११ हजार रुपये व ढाल सन्मानचिन्ह असे बक्षीस दिले जाईल. प्रत्येक सेमीफायनल मध्ये दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह दिले जाईल. गट विजेत्या प्रथम बैलगाडीसाठी सन्मानचिन्ह दिले जाईल. प्रथम क्रमांकाच्या गाडीच्या ड्रायव्हरला श्री यमाई केसरी ड्रायव्हर या किताबाने सन्मानित केले जाईल.
 बैलगाडी क्षेत्राला चांगली दिशा देणार आदर्शवत असं यंदाच औंधच मैदान होण्यासाठी गणेश देशमुख, संतोष जायकर, धनाजी गायकवाड, बाबू माने, शैलेश मिठारी, महादेव माने, धनाजी यादव, अनिकेत देशमुख आदी मंडळी कष्ट घेत आहेत.

डोळ्याचं पारण फेडणारी शर्यत ठरेल
गटाच्या चिठ्ठ्या सर्वांसमक्ष ऑन कॅमेरा (युट्युब लाईव्ह) पेटीतून काढून पारदर्शक लॉट्स पाडले आहेत. संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला हेवा वाटेल असं डोळ्याचं पारण फेडणारं 'श्री यमाई केसरी' मैदान पार पडेल.
-दिपक नलवडे: माजी उपसरपंच

No comments:

Post a Comment