औंध:-खटाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते मार्केट कमिटीचे माजी संचालक यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी ता.खटाव येथे आज शनिवारी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लोणी विकास सोसायटीचे चेअरमन व औंध जिल्हा परिषद गटाचे युवा नेते योगेश फडतरे यांनी दिली.
रक्ताचा तुटवडा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवसानिमित्त महारक्तदान आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे.सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबीर होईल.रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.सायंकाळी सहा वाजता वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, कोयना बँकेचे चेअरमन उदयसिंह पाटील, हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अनिलराव मोहिते, रघुनाथ घाडगे, श्रीमंत पाटील, मानाजीराव घाडगे, चंद्रकांत पाटील, विठ्ठलराव फडतरे,लहुकुमार मदने, राहुल पाटील,राजुभाई मुलाणी,पै.मंगेश फडतरे, सभापती दत्तात्रय पवार, सुनील फडतरे, महेश घार्गे,पोपट बिटले, राजेंद्र पाटील,प्रताप राजेघाडगे, महेश नलवडे, सुनील घोरपडे, शिवाजीराव शेडगे, रामभाऊ पवार, रमेश कदम यांचेसह औंध गटातील विविध गावचे पदाधिकारी, हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन योगेश फडतरे, यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment