Ticker

6/recent/ticker-posts

महाबळेश्वरला शनिवारी जागर नारी शक्तीचा

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
महाबळेश्वर
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ “जागर नारी शक्तीचा २०२५” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील विविध प्रभागातील महिलांच्या ११ गटांनी भारत देशातील विविध राज्यांच्या प्रामुख्याने महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीच्या वेशभूषा व परंपरा याचे दर्शन घडविणारी “भारतीय संस्कृतीचे दर्शन रॅली” दिनांक ८ मार्च २०२५ रोजी दुपारी ०३:०० वाजता बस स्थानक मार्गे-नेताजी सुभाषचंद्र बोस चौक-डॉ.साबणे रोड-छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे समारोप पोलिस परेड ग्राउंड याठिकाणी होणार आहे. यामध्ये ढोल-ताशा,लेझीम,मंगळागौर,महाराष्ट्राचे विविध सण महिला वारक-यांची दिंडी इत्यादी संस्कृतीचे दर्शन रॅलीत होणार आहे.रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे गिरिस्थान प्रशालेच्या मुलींचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा चित्ररथ असणार आहे.तसेच सायंकाळी ०६:०० ते ०९:०० वाजता महिलांसाठी मनोरंजनात्म्क “लोकसंगीताचा नजराणा” या विशेष लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर महिला दिनाच्या कार्यक्रमात महाबळेश्वर शहरातील जास्तीत-जास्त महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.योगेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments