एक गंभीर तर दोन किरकोळ जखमी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज
: येथील पेडगाव रस्त्यावरील पेडगाव गावच्या हद्दीत दोन मोटार सायकल समोरा
समोरील धडकेत वडूजचा युवक सुहास राजेंद्र गुजले ( वय २७ ) हा जागीच ठार
झाला तर दशरथ नवनाथ जाधव ( रा . पेडगाव ) हा गंभीर जखमी झाला आहे .
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की ,
शुक्रवार दि. १८ रोजी सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास पेडगाव गावच्या
हद्दीत वडूज रस्त्यावर देवीदास कुंडलिक मिसळे यांच्या जमिनी शेजारी डांबरी
रस्त्यावर मोटार सायकल क्रमांक एम एच ११ बी क्यू ४३५ व दुचाकी क्रमांक एम
एच ११ सीटी १५७८ वरील चालक दशरथ नवनाथ जाधव (रा. पेडगाव ता. खटाव ) याने
त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने , अविचाराने , रस्त्याच्या परिस्थितीकडे
दुर्लक्ष करून भरधाव वेगात येऊन सुहास राजेंद्र गुजले ( वय २७ ) रा. वडूज
यास गंभीर जखमी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अमर अंकुश पाटोळे रा .
वडूज यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
या फिर्यादीवरून वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल झाला असून सदर अपघाताचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र कांबळे
करीत आहेत .



0 Comments