Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅक्टर दुचाकी अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार


सातारा..22..कराड ते चांदोली रस्त्यावर धोंडेवाडी फाटा येथे ट्रॅक्टर व दुचाकीच्या भीषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विजय कुंभार (वय-५२) असे मृताचे नाव आहे. आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, म्हासोली ता. कराड येथील विजय कुंभार हे उंडाळे येथील शामराव पाटील पतसंस्थेचे कर्मचारी आहेत. ते दुचाकीवरून कराडला कामानिमित्त निघाले होते. धोंडेवाडी फाटा येथे ट्रॅक्टर आणि त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत विजय कुंभार हे जागीच ठार झाले.

अपघाताची नोंद करण्याचे कराड तालुका पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.







Post a Comment

0 Comments