सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावात २५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक गंभीर आणि धक्कादायक अपघात घडला. रमेश लक्ष्मण संकपाळ हे आपल्या घराच्या ओट्यावर झोपलेले असताना, भरधाव वेगात आलेल्या अल्टो कारने त्यांना जोरात उडवले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे, कार चालवणारा इसम पोलीस खात्यात काम करणारा आहे. पोलीस ज्ञानेश्वर बाबुराव राजे आणि तो अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
देवीच्या यात्रेनंतरचा शांतीचा काळ – आणि अचानक झालेला मृत्यू
२४ एप्रिल रोजी गावात जानुबाई देवीची यात्रा झाली होती. संकपाळ कुटुंब देवीच्या कार्यक्रमानंतर घरी परतलं होतं. रमेश संकपाळ हे घराच्या ओट्यावर झोपले होते, आणि पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी भरधाव कार थेट त्यांच्या अंगावर आली. रस्ता मोकळा असूनही चालकाने वेग न थांबवता निष्काळजीपणे गाडी चालवली.
गावकऱ्यांचा संताप – “जे रक्षक, तेच भक्षक”
या घटनेनंतर सर्कलवाडी गावात संतापाचं वातावरण आहे. लोकांना राग येतोय की, जे पोलीस आपली सुरक्षा करतात, त्यांच्याच बेजबाबदार वागणुकीमुळे निरपराध लोकांचा बळी जातो. रमेश संकपाळ हे गावात शांत, मदतीला तत्पर आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तीमत्त्व होतं. त्यांच्या जाण्याने कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव हळहळतो आहे.
गुन्हा दाखल – पण कुटुंबाला हवा न्याय
या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही – संकपाळ कुटुंब आणि गावकरी आता न्यायाची वाट पाहत आहेत. असा अपघात कोणाच्या कुटुंबावर होऊ नये, यासाठी कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होते आहे.
दरम्यान संबंधित पोलीस हे यात्रेचा बंदोबस्त करून नाईट ड्युटी करून घरी चालले होते, रात्रीची वेळ असल्याने त्यांना झोप आली आणि झोपेमध्ये हा प्रकार घडला आहे मात्र स्थानिक नागरिकांनी दारूच्या नशेत पोलिसांनी गाडी चालवली असा आरोप करत संबंधित पोलिसाला रागाच्या भरात मारहाण देखील केली आहे पोलीसाची वैद्यकीय तपासणी केली असता मद्यपान केले असल्याच कुठेही आढळून आलं नसल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल आहे.
संबंधित पोलीस हे ASI असून पुढील वर्षी सेवानिवृत्त होत आहेत



0 Comments