Ticker

6/recent/ticker-posts

कालगावडे राजांनी पादत्राणे घालुन गाभाऱ्यात जाऊ न घेतले शंभू महादेवाचे दर्शन

कालगावडे राज्याने पादत्राणे घालुन गाभाऱ्यात जावुन महादेवाचे दर्शन घेतले

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले : शिखर शिंगणापुर ता.माण येथे चैत्र शु.एकादशीला इंदूर राजघराणेचे वारस कालगावडे राजे यांनी रीतीरीवाजाप्रमाने घोड्यावरून बसुन वाजत गाजत येवुन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. आजच्या दिवशी या राजाचा मान असतो त्यांनी पादत्राणे घालुन गाभाऱ्यात जावुन दर्शन घेतले.चैत्र शु. अष्टमीला शिव पार्वती विवाह सोहळा पार पडला.
          आख्यायिकेनुसार या विवाह सोहळ्याला त्याकाळी इंदूरच्या  राजाला लग्नाचे निमंत्रण दिले गेले नव्हते. म्हणून एकादशी दिवशी येवून निमंत्रण दिले नसल्याने देवाचा निषेध केला होता. आणि आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार कालगावडे राजे हे त्यांचे वंशज घोड्यावरुंन पायात पादत्राणे घालून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेवुन भक्तिरूपी निषेध करतात. 
        मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी कालगावडे राजांनी पुष्कर तलावात स्नान केले. त्यानंतर उमाबनातील नांद्रुकिच्या झाडाखाली बसून कांदा,चटणी आणि भाकरी खाल्ली व न्याहारी केली. इंदूर राजघराणेचे वारसदार माळेगाव पोष्ट राक्षी (ता.शेवगाव जि.अहमदनगर) गणेश सुखदेव कालगावडे यांनी पादत्राणासह मंदिरात जावून शिवलिंगावर बेल,फुल, दवणा विभूती (भस्म) वाहिले व माना पाना प्रमाणे दर्शन घेंतले.आज सर्व शिवभक्त एकादशी निमित्त उपवास करतात मात्र ते न्याहारी करतात. रीतीरीवाजाप्रमाणे कालगावडा राजांनी आज पारंपारिक पध्दतीने घोड्यावरून येवून दर्शन घेतले. महादेवाच्या मंदिरात जावून येवून त्यांच्याबरोबर आलेल्या भाविकांनी महाप्रसाद घेतला. कालगावडे राजे यांच्याबरोबर नगर जिल्हातील सुमारे ९० गावातील भक्त भाविक त्यांच्या समवेत दरवर्षी येत असतात.
          कालगावडे राजे हे एकादशीच्या अगोदर आपल्या लवाजम्यासह शिंगणापूरात दाखल होत असतात.ते गावाच्या वेशीच्या बाहेर डोंगरावर मुक्कामी असतात.

Post a Comment

0 Comments