Ticker

6/recent/ticker-posts

५० हजारांची लाच घेताना कृषी अधिकारी रंगेहात; साताऱ्यात कारवाई



सातारा, दि. २३ : कृषी विभागातील गुणवत्तेच्या अहवालासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृषी अधिकारी रंगेहात पकडल्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. युवराज अन्याबा काटे (वय ५४), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सातारा असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या कृषी कंपनीत तयार होणाऱ्या खत व औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करून प्रतिकूल अहवाल न देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला ८० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजारांवर आली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून ५० हजार रुपये स्वीकारताना काटे यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments