Ticker

6/recent/ticker-posts

सुट्टीतील मौजमजा करण्यासाठी पर्यटकांची पाऊले निसर्ग रमणीय माथेरानकडे

सत्य सह्याद्री .
प्रतिनिधी चंद्रकांत काळे.
 रायगड माथेरान.
सह्याद्री पर्वतरांगांच्या माथ्यावरील जंगल रान म्हणजे माथेरान. प्रदूषण विरहित जगातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान.या पर्यटक स्थळी वर्षभरातून किमान नऊ ते दहा लाख पर्यटक पर्यावरण सहलीचा आनंद घेण्यासाठी माथेरानला येत असतात येथील प्रमुख सहलीचे हंगाम म्हणजे दिवाळी .नाताळ. होळी .व एप्रिल. मे. महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस. या हंगामा सह पावसाळी वातावरण संततधार पाऊस व हिरवेगार दाट जंगल व थंड स्वच्छ हवामान म्हणजेच स्वच्छ हरित माथेरान. येथील निसर्गाच्या सानिध्यातले निसर्ग देखावे म्हणजेच शार्लेट तलाव . माथेरानचे जागृतत देवस्थान पिसरणाथ मंदिर. ऐको पॉईंट .लुव्झा पॉईंट. पालक्यु पॉईंट. मंकी पॉईंट. चौक पॉईंट .व विशेष आकर्षण असणारा वन ट्री हिल पॉईंट. व माथेरानचे आकर्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हॉर्स रायडिंग साठी प्रसिद्ध असणारा पेनोरमा पॉईंट. असे ऐकुन
 अडतिस साईट सीन देखावे पॉईंट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी अलोट दिसत असते.माथेरानची चविष्ट चिक्की. हाती बनवलेल्या चामडी चपला. व हस्तकलेच्या विविध कलाकृती आकर्षक वस्तुची दुकाने. बाजारपेठ येथे आहेत. हॉर्स रायडिंग. घोडे स्वारी. व मे महिन्यात होणाऱ्या अश्व शर्यती साठी जगभरातून नामांकित जॉकी शर्यतीसाठी 
ममथेरानला येत असतात. हात रिक्षातून निसर्ग देखावे पाण्याची एक वेगळीच मजा पर्यटक घेत असतात. 
मंबई पुण्यालगत असणाऱ्या माथेरानला येण्यासाठी प्रवास अतिशय सोपा व सरळ आहे. मुंबई पुण्याहून आपण नेरळ या ठिकाणी आल्यानंतर खाजगी टॅक्सीची सुविधा व माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन सुविधा नेरळ माथेरान उपलब्ध आहे .तसेच आपण आपल्या चार चाकी वाहनाने माथेरानला येऊ शकता. माथेरान टॅक्सी स्टॅन्ड दस्तुरी नाका येथे आल्यानंतर मिनी ट्रेन शटल सेवा. तसेच घोडे. हात रिक्षा. व ई रिक्षाची सुविधा .
 माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत उपलब्ध आहे .
मार्च महिन्यात माथेरान दस्तुरी नाका येथे घोडेवाले यांच्याकडून होणाऱ्या पर्यटकांची फसवणुकी विरोधात माथेरान संघर्ष समितीने व व्यापारी संघटना माथेरानकर यांनी
 पर्यटकांसाठी माथेरान बंद
पुकारला होता परंतु कर्जत खालापूर विधानसभा विभागाचे आमदार महेद्र थोरवे यांनी माथेरान बदचा माथेरान बचाव समिती व अश्वपान संघटना तसेच सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची तसेच माथेरानकर नागरिकांची
तातडीची बैठक घेऊन या बैठकीत सामोपचाराने सर्वांनुमते योग्य तोडगा काढीत योग्य निर्णय देत माथेरान बंदचा संप निर्णय मागे घेण्यात आला. व लगेचच
दुसऱ्या दिवशी माथेरान पर्यटकांसाठी खुले चालू करण्यात आले आहे. माथेरानचे व्यापारी रिक्षा चालक घोडेस्वार व हॉटेल संघटना लॉजिंग धारक माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना सुलभ सोप्या रीतीने सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. तरी जगभरातील पर्यटकांच्या सुट्टीतील सहलीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले निसर्गरम्य माथेरान कडे ओळताना दिसत आहेत .........

Post a Comment

0 Comments