सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी खिंड येथे वडूज सातारा एसटी बस सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक ब्रेकफेल झाली. चालक देवदास वायदंडे यांनी प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या शेजारी असलेल्या नाल्यात उतरवत ५१ प्रवाशांचा जीव वाचवला.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या आणि वाहनधारकांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज आगाराची वडूज सातारा एस. टी. बस क्रमांक एम एच.०७ - सी- ९५६१ ही सायंकाळी पाच वाजता वडूज येथून सुटली. बस त्रिपुटी खिंड येथे आल्यानंतर चालक वायदंडे यांना बसचे ब्रेक लागत नसल्याचे लक्षात आले. बस ब्रेक फेल झाली आहे असे समजल्यानंतर त्यांनी प्रसंगावधन राखत तात्काळ बस महामार्गाच्या कडेला नाल्यात अलगद उतरवली. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या ५१ प्रवाशांचा जीव वाचला. सुरुवातीला बस महामार्ग सोडून विरुद्ध दिशेला गेल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला, मात्र चालक वायदंडे यांनी बसवर नियंत्रण मिळवत बस जागेवर उभी केली. बसच्या पाठीमागील बाजूस काच फुटली आहे. आपला जीव वाचला असल्याचे पाहून बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चालक वायदंडे यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत.
0 Comments