मायणी
येथे पोलीस स्टेशन व्हावे यासंदर्भात आयोजित लाक्षणिक उपोषणात आपल्या
मागण्यांचे निवेदन पोलीस उपअधीक्षक विक्रांत पाटील यांना देताना डॉ. विकास
देशमुख व पत्रकार प्रकाश सुरमुख व मान्यवर
दि.15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा
मायणी दि. २३ प्रतिनिधी तानाजी चव्हाण
मायणीला
पोलीस स्टेशन झालंच पाहिजे,चोरांचा तपास लागलाच पाहिजे. आदी घोषणा देत
मायणीतील ग्रामस्थांनी मायणी पोलीस दुरुक्षेत्रामध्ये येऊन एक दिवशी
लाक्षणीक उपोषण केले .पोलीस व महसूल विभागाच्या आश्वासनानंतर सदर उपोषण
स्थगित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून मायणी
पोलीस स्टेशनचा प्रश्न प्रलंबित आहे. मायणी येथे मोठे शैक्षणिक संकुल व
मोठी बाजारपेठ आहे. मायणी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने व अपूरा
पोलीस कर्मचारी वर्ग असल्याने मायणीच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर
येत असतो .गेल्या महिन्याभरात मायणी मध्ये लहान मोठ्या चोरीच्या व
लूटमारीच्या घटना घडल्या. मात्र त्याचा कोणताही तपास न लागल्याने
नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती .या पार्श्वभूमीवर पोलीस
विभागास एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
मायणी
गावातून मुख्य बाजार पेठेतून असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोर्चा
पोलीस दुरक्षेत्रामध्ये आल्यानंतर तिथे विविध लोकांनी आपापली मते
मांडली.यामध्ये गावात झालेल्या चोऱ्यांचा तपास तातडीने करावा, बिगर नंबर
प्लेटच्या दुचाकी गाड्यांवर व रोड रोमिओवर कारवाई करावी,लवकरात लवकर पोलीस
स्टेशनचा प्रश्न मार्गी लावावा,तात्पुरत्या स्वरूपात अपुरा कर्मचारी वर्ग
वाढवून घ्यावा, ग्रामपंचायतीने महत्त्वाच्या ठिकाणी गावामध्ये सीसीटीव्ही
बसवून घ्यावेत, व्यापारी वर्गांनी आपल्या दुकानापुढे सीसीटीव्ही बसवावेत
आदी विविध मुद्द्यांवर साधक- बाधक चर्चा झाली.नंतर मायणी पोलीस
दुरुक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत पाटील यांनी अपूरा कर्मचारी वर्ग
वाढवून घेणे ,पोलीस स्टेशनचा प्रश्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने
मार्गी लावणे,ज्या काही चोऱ्या झाल्या आहेत त्या संदर्भात तपास गुप्तचर
यंत्रणेमार्फत सुरू असून लवकरच गुन्हेगारांना शोध घेतला जाईल अशा प्रकारचे
आश्वासन दिल्यानंतर डॉ. विकास देशमुख व खटाव तालुका पत्रकार संघाचे माजी
अध्यक्ष प्रकाश सुरमुख यांच्या हस्ते पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी
सरपंच प्रतिनिधी रणजित माने,उपसरपंच दादासाहेब कचरे,बाजार समितीचे संचालक
स्वप्निल घाडगे,माजी उपसरपंच आनंदराव शेवाळे,ग्रामपंचायत प्रतिनिधी हेमंत
जाधव,अजिंक्य उद्योग समूहाचे चेअरमन हिम्मत देशमुख,राजू कचरे,दीपक
कणसे,विशाल चव्हाण, विलास सोमदे,धैर्यशील चव्हाण,मन्सूरबाई नदाफ, किरण
देशमुख, जितूशेठ कणसे,संतोष सुरमुख,पोलीस पाटील प्रशांत कोळी,सर्व पत्रकार
बंधू ,व्यापारीवर्ग,मेडिकल असोसिएशनचे सदस्य, ग्रामपंचायत व सोसायटीचे व
विविध सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी
पत्रकार प्रकाश सुरमुख यांनी जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांच्याशी
संपर्क साधून पोलीस स्टेशनचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा व तोपर्यंत
मायणी गावच्या सुरक्षिततेसाठी ज्यादा पोलीस कर्मचारी वर्ग वाढवावा अशी
विनंती केली असता त्यांनी कर्मचारी वर्ग तातडीने वाढवून देण्याचे आश्वासन
यावेळी दिले.
दरम्यान नायब
तहसीलदार सुनिल जाधव यांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रामध्ये येऊन परिस्थितीची
.संपूर्ण माहिती घेऊन या संदर्भात महसूल विभागामार्फत ज्या काही बाबींची
गरज लागेल त्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
येत्या
15 ऑगस्ट पर्यंत मायणी पोलीस स्टेशनच्या संदर्भात काहीही हालचाल न झाल्यास
येत्या पंधरा ऑगस्ट रोजी मायणीतील पत्रकार व ग्रामस्थ आमरण उपोषण करतील
असा इशारा यावेळी देण्यात आला.

0 Comments