Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणचे गुंड दोन वर्षांसाठी तडीपार

 


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण:
फलटण परिसरात सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणार्‍या टोळीतील पोलिसांकडून दोघांवर दोन वर्षांसाठी तडिपारीची कारवाई करण्यात आली.  भरत लक्ष्मण फडतरे (वय 36) व मनोज राजेंद्र हिप्परकर (वय 30, दोघे रा. मलटण, फलटण) अशी या गुंडांची नावे आहेत.  
या दोघांवर वारंवार जबरी चोरी, खंडणी करीता अपहरण करणे, गर्दी मारामारी करुन अपहरण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी सदर टोळीविरुध्द संपूर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हद्दीचा लगतचा भाग असलेले पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी फलटणचे उपअधीक्षक राहुल आर धस,  यांनी केली होती.
त्यांच्यावर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला ते फलटण शहर परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते.
त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर  सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस  संपूर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हद्दीचा लगतचा भाग असलेले पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, वरिष्ठ हवालदार अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाण्यातील हवालदार बापु धायगुडे, वरिष्ठ हवालदार जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला.

Post a Comment

0 Comments