Ticker

6/recent/ticker-posts

साताऱ्यात चमत्कार, मातेच्या कुशीत विसावणार 7 बाळं; गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा.


साताऱ्यात घडलेली एक विलक्षण घटना जिल्हाभरच नव्हे तर संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया (वय 27) या तरुणीने जिल्हा शासकीय रुग्णालयात एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये तीन मुली आणि एक मुलगा आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी काजलने जुळ्या तिळ्यांना (तीन बाळांना) जन्म दिला होता. त्यामुळे तिच्या पोटी जन्मलेल्या बाळांची एकूण संख्या सातवर पोहोचली आहे.

गुजरातची मूळ रहिवासी असलेल्या काजलचा पती विकास खाकुर्डिया हा सध्या सासवड येथे गवंडी म्हणून काम करतो. त्यांच्या घरी आता सात देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला असून नातेवाईक, मित्रमंडळी आनंदात आहेत.

ही प्रसूती अत्यंत जटिल स्वरूपाची होती. मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय पथकाने अपार मेहनत घेत यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया पार पाडली. आई व सर्व चारही बाळं सध्या पूर्णपणे स्वस्थ आहेत.

एका मातेच्या पोटी एकाच वेळी चार बाळांचा जन्म, आणि याआधी तिळ्यांचा इतिहास—ही घटना वैद्यकीय दृष्ट्या विलक्षण मानली जात आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देणारी ही कहाणी साताऱ्यातील अभिमानाचा क्षण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments