काम पूर्णत्वाकडे; दुसऱ्या टप्प्यात हॉस्पिटलचे काम सुरू, ३२ कोटींचा निधी उपलब्ध
सातारा,
ता. 14 : सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले असून, अडीच ते तीन
महिन्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर जिल्हा रुग्णालयातील मेडिकल कॉलेज नव्या
इमारतीत सुरू होणार आहे. कॉलेज इमारत आणि वसतिगृह, प्रयोगशाळेचे काम
पूर्णत्वास गेले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
शासनाने ३२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच आणखी निधीही
उपलब्ध होणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगितले.
सातारा
शासकीय मेडिकल निधीची अडचण निर्माण झाली कॉलेजच्या कामाला मध्यंतरी होती.
त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातीलकामे रखडली होती. मात्र, बांधकाम विभागाने ७०
कोटींची मागणी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली होती. त्यापैकी ३२ कोटी
रुपये शासनाने उपलब्ध केले आहेत. त्यातून दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू
आहेत.
ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. ३५ टक्के काम
पूर्णत्वास गेले आहे, नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने जिल्हा रुग्णालयातील
महिला रुग्णालयात मेडिकल कॉलेजचे कामकाज सुरू आहे.
सातारा
मेडिकल कॉलेजच्या कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक
बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातत्याने लक्ष ठेऊन पाठपुरावा
करत आहेत. मध्यंतरी निधी उपलब्धता थांबली होती. आता पहिल्या टप्प्यातील
सर्व प्रकारची वसतिगृहे, प्रयोगशाळा, मुख्य इमारतीचे काम पूर्णत्वास गेलेले
आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील ३५ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. तिसऱ्या
टप्प्यासाठी थोडाफार निधी लागणार आहे. तोही तातडीने उपलब्ध होण्याची
अपेक्षा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे येत्या अडीच
महिन्यांत मेडिकल कॉलेज नवीन इमारतीत स्थलांतरित होऊ शकणार आहे. केवळ
हॉस्पिटलचे काम अपूर्ण आहे. तेही मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
त्यामुळे मार्च २०२६
मध्ये मेडिकल कॉलेजची सर्व कामे
पूर्ण होणार आहेत. त्यासाठी बांधकाम विभागाने मार्च २०२६ ची डेडलाईन ठरवली
आहे. नवीन वर्षांत साताऱ्याचे मेडिकल कॉलेज नवीन इमारतीत पूर्णपणे सुरू
होणार आहे.
सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे काम
पूर्णत्वास जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०२६ ची डेडलाइन
ठरवली आहे. आतापर्यंत वसतिगृहे, निवासस्थाने, मेडिकल कॉलेजची मुख्य इमारत,
मुलामुलींच्या वसतिगृहाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अडीच महिन्यांत
नवीन इमारतीत मेडिकल कॉलेजचे कामकाज सुरू होईल. उर्वरित कामांत
हॉस्पिटलच्या कामासह इतर कामे पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.
त्यासाठी निधीही उपलब्ध होत आहे.- अ. अ. देसाई, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
0 Comments