सोन्याच्या अमिषाने महिलेला गंडा
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: पायात सोन्याच्या विटा पडल्या आहेत. त्याचे अमिष दाखवून 57 वर्षीय महिलेला राधिका रस्त्यावरील मार्केट यार्डसमोर दोघा अज्ञातांनी गंडा घातला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरेखा मारुती सावंत (वय 57, रा. लिंब, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली. दि. 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास सावंत या भारत गॅस एजन्सीसमोरील रस्त्याने चालत जात असताना लेंगा शर्ट घातलेला अंदाज 60 वर्षीय इसम त्यांच्या समोरून चालत निघाला होता. त्याने मागे वळून तुमच्या पायाखाली काहीतरी पडले आहे, असे म्हणाला. तेव्हा सावंत यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर निळा टी शर्ट घातलेल्या अंदाजे 40 वर्षीय दुसऱ्या इसमाने जमिनीवरून एक रुमाल उचलला. त्यानंतर सावंत व ते दोघे अनोखळी मार्केट यार्डात गेले. त्यावेळी तेथे रुमाल उचललेला पाहिला असता त्यामध्ये सोन्याच्या दोन बारीक विटा होत्या. दोघांनी त्यातील एक वीट सावंत यांना देण्याचा बहाणा करून त्या बदल्यात त्यांच्या अंगावरील 25 हजार रुपयांचे दागिने फसवणूक करून लंपास करत पोबारा केला. तपास सहायक फौजदार कदम करत आहेत.
तीन चारचाकींना धडक, डंपरचालकावर गुन्हा
सत्य सह्याद्री/वडूज
मांडवे, ता. खटाव येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या किया सोनेट, मारुती डिझायर व मारुती वॅगनर या तीन चारचाकी वाहनांना भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याप्रकरणी डंपरचालक गणेश अर्जुन राऊत (वय 20, रा. वावरहिरे, महादेव दरा, ता. माण) याच्याविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघतात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दि. 13 रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. ॲड. मुबारक याकुब मुलाणी (वय 59, सध्या रा. पुसेगाव, मूळ रा. मांडवे) यांनी फिर्याद दिली.
तीन डीपी फोडून 135 किलो तांब्याची तार लंपास
सत्य सह्याद्री/फलटण
मौजे खिलारे ॲडिशनल डीपी व खुंटे, ता. फलटण गाच्या हद्दीतील करण नावाचा डीपी व भिलकटी गावच्या हद्दीतील डीपीचे वेल्डिंग तोडून त्यातील 80 हजार रुपये किंमतीची 135 किलो तांब्याची तार अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याग गुन्हा दाखल झाला आहे.
फलटणला भरदिवसा दुचाकी चोरी
सत्य सह्याद्री/फलटण
येथील रविवार पेठेतील सागर एंटरप्रायझेस दुकानासमोर लावलेली 55 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार फॅब्रिकेशन व्यावसायिक प्रशांत राजेंद्र पवार (वय 35) यांनी नोंदवली असून फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 10 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
तांब्याच्या तारा चोरणाऱ्यावर गुन्हा
सत्य सह्याद्री/खंडाळा
शिंदेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत एसीजी फार्मापॅक कंपनीच्या मेन गेटमधून 31 मीटर लांबीच्या केबल सोलून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेणाऱ्या बाबासाहेब रामचंद्र थोरात (वय 33, रा. शिरवळ) याच्याविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र सुरेश पवार (वय 43, सुपरवायझर सिक्युरिटी) यांनी फिर्याद दिली. दि. 11 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थोरात विनापरवाना तारा चोरून घेऊन निघाला होता.
पत्नीला मारहाण, पतीवर गुन्हा
सत्य सह्याद्री/कराड
माझ्या विरोधात केलेली घटस्फोटाची केस मागे घे व माझ्यासोबत घरी चल, असे म्हणत पत्नी व सासऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी उल्हास भीमराव पाटील (रा. चमके, ता. अथणी, जिल्हा बेळगाव) याच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे सासरे सदाशिव नामदेव भोसल (वय 76, रा. यशवंत कॉलनी, विद्यानगर) यांनी फिर्याद दिली.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकी चोरी
सत्य सह्याद्री/सातारा
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील राजपुरोहित दुकानासमोर पार्किंगमध्ये लावलेली 25 हजार रुपये किंमतीची ॲक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सिद्धेश गोरख फडतरे (वय 19, मूळ रा. रणशिंगवाडी, ता. खटाव, सध्या रा. थोरात क्लासेस, सातारा) याने नोफ्लदवली असून शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लग्नाच्या अमिषाने अत्याचार, करंजेतील युवकावर गुन्हा
सत्य सह्याद्री/सातारा
लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी राहूल राजेंद्र निकम (वय 30, रा. शामसुंदर बंगला, करंजे) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय युवतीने फिर्याद दिली. जानेवारी 2020 पासून निकम याने युवतीचा विश्वास संपादन करून लग्नाचे अमिष दाखवत त्याच्या रहात्या घरात तसेच कास पठारावरील जांभळे यांचे हॉटेल, यवतेश्वर येथील पार्टे हॉटेल येथे वारंवार संमतीशिवाय शारीरिक संबंध केले. शरीर सुखास नकार देताच राहूल मारहाण करुन जबरदस्तीने शरीरसूख घेत असे व युवती गर्भवती राहू नये यासाठी वेळोवळी वेगवेगळ्या प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्याही खाण्यास दिल्या. व लग्न न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महाबळेश्वर येथून युवक बेपत्ता
सत्य सह्याद्री/महाबळेश्वर
येथून नितीन नरहरी काळे (वय 41) हा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याची तक्रार त्याचे चुलते विलास बाबुराव काळे (वय 5, रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोफ्लदवली आहे.
अपशिंगे येथून युवक बेपत्ता
सत्य सह्याद्री/अपशिंगे
अपशिंगे, ता. सातारा येथून विनय महादेव दीक्षित (वय 20) हा एसआर इंडस्ट्री, एमआयडीसी सातारा येथे जातो, असे सांगून घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याची आई वनिता महादेव दीक्षित यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात नोफ्लदवली आहे.
0 Comments