Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीतील दलबदलू व गद्दारांना जनता यावेळी धडा शिकवेल- संजय भोसले



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण: भाजपा महायुतीतील सर्वच घटक पक्ष जनतेच्या मुळावरती उटलेले असून,जनतेची लुट करणारी आणी कायद्याला तोडून मोडून बेकायदेशीर सरकार चालविणार्‍या अशा भ्रष्ट नेत्यांना आणी त्यांचेसोबत लढणारांना खरा धडा शिकविण्याची या नगरपालीका निवडणूकांत जनतेला चालून आलेली ही नामी संधी असून अशा दलबदलू गद्दारांना जनता नक्कीच धडा शिकवेल असे सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत म्हटले आहे.

भाजपासह,अजितदादा पवार गट असो की, शिंदे सेना यांची मिलीभगत यांचा सत्ता आणी सत्तेतून पैसा हा त्यांचा अजेंडा जनतेतून आता लपून राहिलेले नसून त्यांचे भिंग ही नुकतेच फुटले आहे, पार्थ अजित पवार यांचा पुणे येथील अठराशे कोटींचा जमिन गैरव्यवहार हे ताजेतवाने उदाहरण जगजाहीर झाले आहे. अशा भ्रष्ट व लुटारु टोळीला हद्दपार करणेची हिच ती वेळ असलेचे देखील सरतेशेवटी भोसले यांनी म्हणतानाच, मातोश्री व ठाकरे घराण्यावरती गरळ ओकणारे महायुती सरकारमधील सर्वच जबाबदार घटक पक्षांना निष्ठावंत शिवसैनिक यावेळी नक्कीच चारीमुंड्या चित करतील,नव्हे काही गोलगोल व सर्वच पक्षांतील वरीष्ठांचे आजूबाजूला कायम लवंडणारी सर्व पक्षिय नेते मंडळी स्व पक्षाला अंधारात ठेऊन विरोधकांत सामिल असणारी यांचा देखील जनतेला समाचार घेणेची ही योग्य संधी आहे असेही सरतेशेवटी भोसले यांनी म्हटले आहे.
यावेळी माण व फलटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments