Hot Posts

6/recent/ticker-posts

अनुभव, प्रामाणिकता आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे डी. एम. बावळेकर ठरु शकतात नागरिकांची पहिली पसंती.....


महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५

महाबळेश्वर : शहरातील सध्याच्या राजकीय घडामोडींना वेग येत असताना महाबळेश्वरमध्ये मतदारांची चर्चा फक्त एका नावाभोवती फिरताना दिसत आहे डी. एम. बावळेकर. नगर परिषद प्रशासनातील स्पष्ट अनुभव, स्थानिक प्रश्नांची अचूक जाण तसेच सामाजिक बांधिलकीची सातत्यपूर्ण अंमलबजावणी या तीन महत्त्वाच्या घटकांवर आधारलेला त्यांचा प्रवास, आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना निर्णायक आघाडी मिळवून देत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दांडगा अनुभव महाबळेश्वरच्या गरजांना साजेसं नेतृत्व....
महाबळेश्वरसारख्या पर्यटनप्रधान आणि भूप्रदेशाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या शहरात प्रशासनाचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पाणीपुरवठा, वाहतूक नियोजन, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय संतुलन, तसेच बाजारपेठ व्यवस्थापन या सर्व विभागांना एकत्रितपणे कार्यान्वित करताना कौशल्य आणि व्यवहारज्ञान आवश्यक असते.

डी. एम. बावळेकर यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात याच सर्व क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत नागरिकांकडून विश्वास कमावला आहे. निर्णय प्रक्रियेतील वेग, प्रशासनातील समन्वय आणि कार्यकारी पद्धतीतील पारदर्शकता यामुळे त्यांचे नेतृत्व नागरिकांच्या नजरेत अधिक विश्वासार्ह बनले आहे.

मतदारांमधील वाढता विश्वास जनसंपर्क मोहिमेत ऊसळलेला उत्साह

अलीकडील जनसंपर्क मोहिमेत गाठी भेटी, व्यापारी संवाद, सामाजिक संस्थांच्या बैठका आणि युवक गटांशी केलेल्या परस्परसंवादातून एकच गोष्ट स्पष्ट झाली बावळेकरांविषयीचा लोकविश्वास प्रचंड आहे.

नागरिकांनी त्यांच्याकडे केवळ नेता म्हणून नाही तर सतत उपलब्ध, समाधानकारक आणि जबाबदार व्यक्ति म्हणून पाहिले आहे. “संपर्कात राहणारा नेता, समस्या त्वरित सोडविणारा आणि राजकारणापेक्षा विकासावर भर देणारा माणूस हवा,” असा सूर महाबळेश्वरात स्पष्टपणे जाणवत आहे.

सामाजिक बांधिलकी नेतृत्वाचा मूलाधार

डी. एम. बावळेकर यांनी राजकीय भूमिकेसोबत सामाजिक जीवनातील जबाबदाऱ्या समान तितक्याच निष्ठेने सांभाळल्या आहेत. त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणारा ठरला आहे.

विकास आणि सामाजिक उत्तरदायित्व या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जपणारे नेतृत्व दुर्मिळ असल्याचे अनेक नागरिकांनी नमूद केले. महाबळेश्वरच्या विकासाबद्दल स्पष्ट आणि दूरदृष्टीचा आराखडा

पर्यटनदबाव, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून महाबळेश्वरने टिकून राहण्यासाठी दूरदृष्टीचे नियोजन आवश्यक आहे. डी. एम. बावळेकर यांनी यासाठी पुढील निर्देशांक स्पष्ट केले आहेत :

पर्यटन सुविधांचा दर्जा उंचावणे
रस्ते व नागरी सुविधा आधुनिक करणे
स्थानिक व्यापाऱ्यांसाठी स्थिर आणि सुटसुटीत व्यापार वातावरण
स्वच्छता व्यवस्थेचे तंत्रज्ञानाधारित आधुनिकीकरण
पाणीपुरवठा व वाहतूक व्यवस्थेतील दीर्घकालीन उपाय
स्थानिक तरुणांसाठी रोजगारक्षम प्रकल्प

या सर्व योजना नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत.
निवडणूक समीकरणे त्यांच्या बाजूने? प्रतिसादातून स्पष्ट संकेत
शहरभरातील वातावरणावर नजर टाकल्यास, डी. एम. बावळेकर यांना जनसामान्यातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ठरतो.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अनुभव , विश्वास, कार्यक्षम विकासदृष्टी या त्रिसूत्रीवर आधारित समीकरण आगामी निवडणुकीत त्यांना निर्णायक फायदा देऊ शकते.

महाबळेश्वरच्या विकासाच्या केंद्रस्थानी ठाम, जाणते, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व हवे ही नागरिकांची अपेक्षा आहे.या अपेक्षेला सर्वाधिक साजेसा चेहरा म्हणून डी. एम. बावळेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

Post a Comment

0 Comments