Ticker

6/recent/ticker-posts

चितळीत डॉक्टरला कोयत्याच्या धाकाने लुटले


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

मायणी: चितळी, ता. खटाव येथे कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरची सव्वा लाखाची लूट केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

डॉ. जोतिराम ज्ञानदेव पवार (वय ४१, रा. मूळ  रा. चितळी, सध्या रा. भारत माता विद्यालयासमोर, मायणी, ता. खटाव ) यांनी फिर्याद दिली. दि. १० रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास चितळी, ता. खटाव हद्दीत माहुलीचा ओढा नामक शिवारातील डॉ. पवार यांच्या शेताच्या पाणंद रस्त्यावर ही घटना घडली. डॉ. पवार तेथून जात असताना दोन अनोळखी इसम आले व त्यांनी गाडीची काच खाली घेण्यास सांगितले. 

त्यानंतर डॉ. पवार यांना कोयत्याचा धाक दाखवून पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठ्या असा १ लाख २३ हजार रुपये किंमतीचे दागिने हिसकावून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

घटनास्थळी उपअधीक्षक रणजित सावंत यांनी भेट देऊन तपासाच्य सूचना केल्या. सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील तपास करत आहेत.  

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मोहितेमळा येथेही पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करुन लुटण्यात आले होते. 

Post a Comment

0 Comments