Ticker

6/recent/ticker-posts

घरकामगार युवतीने मारला २ लाखांवर डल्ला


 सत्य सह्याद्री/सातारा

यथील जुनी एमआयडीसीतील गणेश चौकानजीकच्या शिवाजीनगर येथे घरफोडी करून २ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याप्रकरणी घरकामगार युवतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सुनिता शिरीष काकडे (वय ६०, रा. जुनी एमआयडीसी, सातारा) यांनी फिर्याद दिली. अरुणा राहुल भोसले (वय २९, रा. कुमठेकर भवन जवळ, जाधव यांच्या चाळीत, कोडोली, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या  युवतीचे नाव आहे.  दि. ८ ते दि. १६ च्या दरम्यान भोसले यांनी काकडे यांच्या रहात्या घरातील लोखंडी कपाटातील सुटकेस मध्ये ठेवलेले सोन्याची साखळी असलेले कानातले, दीड लाखांचा राणीहार, १० हजारांची चांदीची वाटी, जोडवी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

घटनास्थळी उपअधीक्षक राजीव नवले यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. हवालदार कदम तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments