Ticker

6/recent/ticker-posts

वाईमध्ये चोर-पोलिसांचा लपाशिवीचा खेळ चोरट्यांचा पुन्हा वरखरवाडी शेती पंप डीपीवर डल्ला : वीज वितरण विभागाचा लाखोचा मुद्देमाल गायब



वाई/प्रतिनिधी : वाईच्या पश्चिम भागातील शेती पंपाच्या केबल चोरी बरोबरचा वीज वितरण विभाग मालकीच्या ठिकठिकाणच्या डीपीवर हातोहात डल्ला मारून लाखो रुपयांचा माल
लंपास करत आहेत परंतु वाई पोलिसांना सदर आरोपीना पकडता येत नाहीत चोर पोलिसांच्या या खेळात मात्र शेतकऱ्यांचे व वीज वितरण विभागाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे नावापुरत्या दबंग वाई पोलिसांच्या तपासावर शंका व्यक्त होत असून शेतकऱ्यां मधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे &&
कायदा सुव्यवस्थे बाबत वाई पोलिसांच्या सुमार कामगिरीमुळे वाई तालुक्यातील अट्टल गुन्हेगार व चोरटे चांगलेच निर्धावलेले आहेत तसही वाई शहरात लाखो,करोडो रुपयांचे दरोडे टाकूनही वर्षानुवर्षे एकही दरोडेखोर वाई पोलिसांच्या हाताला लागत नाही आणि चुकून लागलाच तर चोरांनी पळवलेला मुद्देमाल परत मिळतच नाही त्यामुळे वाई पोलिसांच्या तपासाच्या ग्यानबाची मेक अजून पर्यंत वाईकरांना कळली नाहीआणि वाई पोलीसही ती कुणाला कळू देत नाहीत && वाईच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धोम धरण जलाशयात विद्युत मोटरी टाकूनइलेक्ट्रिक
केबल द्वारे शेतीला पाणी पुरवठा केला आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करावा लागत आहे धरण जलाशया पासून सर्व गावठाण जवळपास दोनअडीच किलोमीटर लांब आहेत याचा फायदा घेत चोरटे रात्रीच्या वेळी लाखो रुपय किमतीच्या केबल चोरून पोबारा करत आहेत त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे चोर धाडीचे हे सत्र सलग कित्येक वर्ष चालू आहे परंतु आजतागायत वाई पोलिसांकडून एकाही चोरट्याला पकडण्यात अथवा त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यश आले नाही ही खरी शोकांतिका आहे && गेली महिना भरा पासून चोरट्यानी वीज वितरण विभागाच्या शेती पंपाच्या डीपी चोरण्याचा सपाटा लावला आहे येत्या महिनाभरात मेणवली एमआयडीसी परिसरातील जवळपास पाच सहा डीपी चोरून नेनाऱ्या चोरट्यानी नुकतीच वरखरवाडी येथील डीपीवर डल्ला मारला आहे याबाबत रीतसर तक्रारी देऊनही पोलिसांच्या हाताला एकही चोरटा लागत नसल्याने वाई पोलिसांच्या तपास यंत्रनेवर प्रश्नचिन्ह व शंका उपस्थित केल्यास कुणाला नवल वाटायला नको && 

Post a Comment

0 Comments