Ticker

6/recent/ticker-posts

खरशींगे–वरुडमध्ये पदयात्रा व कोपरा सभांतून विकासाचा निर्धार

सत्य सह्याद्री/औंध प्रतिनिधी
औंध: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीताई गोरे आणि दादासाहेब इंगळे यांच्या प्रचारार्थ खरशींगे व वरुड गावांत पदयात्रा आणि कोपरा सभा उत्साहात पार पडल्या. गावोगावी थांबून नागरिकांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी आपल्या कार्याचा व भावी योजनांचा आराखडा मांडला. खरशींगे आणि वरुड येथे पदयात्रेला तरुण, महिलावर्ग, ज्येष्ठ आदी मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला. या पदयात्रेदरम्यान दादासाहेब इंगळे यांनी जनतेपुढे स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडत सांगितले की, “इथून पुढचे आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित करणार आहे. मुंबईला कधी गेलो तरी जाताना आणि येतानाही जनतेची कामेच प्राधान्याने पूर्ण करणार. निवृत्तीनंतरचे आयुष्यही सामाजिक कार्यासाठीच वाहीन,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
          भारतीताई गोरे यांनीही ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या याबाबत ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “ग्रामीण भागातील प्रत्येक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार,” असे त्यांनी सांगितले.
         पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधत उमेदवारांनी विकास, पारदर्शकता आणि जनसेवा हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले. गावकऱ्यांनीही आपल्या समस्या, अपेक्षा मांडत संवाद साधला. या कार्यक्रमामुळे परिसरात निवडणूक वातावरण तापले असून, आगामी काळात प्रचाराला आणखी वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments