Ticker

6/recent/ticker-posts

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करुन पेटवलेचौघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा, लोणंद पोलिसांची कारवाई

फोटो ओळ- सुखेड येथील खुनातील आरोपीसह सातारा पोलीस दलाची टीम.


सुखेड (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत सोमनाथ कल्याण बोबडे (वय ३० रा. पाली रोड,कळंबोली) याचा मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा आवळून खून करुन त्याचे पाय बांधून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यास विहीरीमध्ये ढकलून खुनाचा पुरावा नाहीसा करणाऱ्या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने लोणंद पोलीसांच्या मदतीने अटक केली आहे. यात

या घटनेबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक महिती अशी, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास सुखेड येथील चोपडे वस्तीजवळील आबा जयवंत चोपडे यांच्या विहीरीमध्ये एका २५ ते ३० वर्षाच्या अनोळखी पुरुषाचा अर्धवट जाळून हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, लोणंदचे सपोनि शिवाजी जायपत्रे, यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सपोनि शिवाजी जायपत्रे यांना मयताचा, आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
यानंतर सपोनि रमेश गर्जे यांच्या टीमने घटनास्थळाची पाहणी करुन घटना स्थळानजीक असणाऱ्या सर्व मार्गावरील सीसीटीव्हीची पाहणी करुन एक संशयित कार निष्पन्न केली. या संशयित कारबाबत अधिक तपास केला असता या अनोळखी इसमाचा खून कळंबोली येथील बंडू बापू भिसे या मुख्य संशयिताने त्याचे साखरवाडी (ता.फलटण) पुणे येथील साथीदारांसह केल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर सपोनि गर्जे यांच्या पथकाने तात्काळ कळंबोली येथे जाऊन स्थानिक पोलीसांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेऊन या गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सोमनाथ कल्याण बोबडे (वय ३०),रा .पाली रोड, कळंबोली यांचा त्याच्या मैत्रीणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन इतर तीन साथीदारांच्या मदतीने कळंबोली येथून स्वत:च्या होडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने टाकून दोरीने त्याचे हातपाय बांधून दुसऱ्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. तसेच नंतर त्याचा मृतदेह त्याच होंडा सिटी कार (क्र.एम.एच. १२ डी.वाय ८८४६) मधून सुखेड गावचे हद्दीत चोपडे वस्ती येथे आणून त्याच्या प्रेतावर पेटोल टाकून पेटवून देवून त्याचे प्रेत विहीरीमध्ये ढकलून देवून खुनाचा पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच त्याचा एक साथीदार साखरवाडी (ता. फलटण) येथे तर इतर २ साथीदार हे पुणे येथे राहत असल्याचे त्याने सांगितले, त्यांनतर सपोनि शिवाजी जायपत्रे यांनी साखरवाडी येथील आरोपीस ताब्यात घेतले. तर स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलीसाच्या पथकाने इतर २ आरोपींना पुणे येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडू बापू भिसे रा. कळंबोली (मूळ रा. दुधेबावी ता. फलटण) विजय पोपटराव पवार (रा. साखरवाडी ता फलटण) किरण विकास गायकवाड रा. होळ ता फलटण हल्ली पारीचौक गणपती मंदिराजवळ पुणे. श्रीनिवास ज्ञानेश्वर (लोणे रा .चुरमापुरी ता अंबड,हल्ली रा धायरी पुणे) यांना सातारा पोलीसांनी अटक केली आहे.

हा गुन्हा उघड होण्यासाठी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रमेश गर्जे, सपोनि शिवाजी जायपत्रे, रोहित फर्णे, विश्वास शिंगाडे, पारीतोष दातीर, रोहित हेगडे, विश्वनाथ संकपाळ, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिके, शरद बेबले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अमित झेंडे, मनोज जाधव, हसन तडवी, स्वप्नील कुंभार, स्वप्नील शिंदे, पृथ्वीराज जाधव, धीरज महाडीक, विशाल पवार, रोहित निकम, अमृत कर्पे, पंकज बेसके, विजय निकम, आनंदा भोये, विजय पिसाळ, विष्णू धुमाळ, नितीन भोसले, सतिश दडस, बापुराव मदने, अंकुश कोळेकर, अवधुत धुमाळ, अमोल जाधव या टिमने कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments