सत्य सह्याद्री/सातारा
फोनवर खूप वेळ बोलत असताना कोणाबरोबर बोलतेस, असे विचारल्याच्या रागातून पत्नीने डोक्यात लाटणे मारून जखमी केले.
याप्रकरणी कविता शिवाजी सपकाळ (घर नं. ५०, रा. दुर्गापेठ, केसरकर पेठ, सातारा) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा पती अर्जुन शिवाजी सपकाळ (वय ३२) याने फिर्याद दिली. दि. ५ रोजी सकाळी ७ वाजता ही घटना घडली.


0 Comments