Ticker

6/recent/ticker-posts

प्रतापसिंहनगरात युवकावर कोयत्याने हल्ला, गुंड ललन जाधव ताब्यात

 


सातारा (सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क): प्रतापसिंहनगर परिसरात युवकावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी गुंड ललन दत्तात्रय जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देगाव फाटा येथील भंगार दुकानात शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हप्ता मागणीवरून वाद झाला. अनिकेत बापू गायकवाड याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ललन जाधव, रुपेश नाईकनवरे व इतर चार जणांनी कोयत्याने हल्ला केला.

या प्रकरणात जखमी अनिकेत गायकवाड याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ललन जाधव याला एमआयडीसी पोलीस चौकीत ताब्यात घेतले आहे.

घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments