Ticker

6/recent/ticker-posts

सव्वा लाखांची लाच घेताना पुरवठा निरीक्षकासह दोघे जेरबंद


 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

कोरेगाव: कोरेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी अन एका खाजगी इसमाला १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद कैलास शिंदे (पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय, कोरेगाव) अन अवधुत दिलीप कालेकर (खाजगी इसम, कोरेगाव) अशी अटकेत घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची कोरेगाव येथे गॅस एजन्सी आहे. गोडाऊनची वारंवार तपासणी न करण्यासाठी अन तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी आरोपी शिंदे यांनी सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने भीतीपोटी २५ हजार रुपये दिले होते. उर्वरित रकमेबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

दि. १ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत आरोपीने तडजोडीनंतर १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. ६ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला.

जनसेवा सहकारी बँक, कोरेगाव परिसरात आरोपी शिंदे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम अवधुत कालेकर यांनी पंचासमक्ष १ लाख २५ हजार रुपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील पाटील, गणेश ताटे, निलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे अन चालक महेश पुजारी यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे करत आहेत.

१..⚡ वीज बिल 0 करायचंय?
*RV सौरऊर्जा 🌞*
☀️ On-Grid सोलर सिस्टम💰 80-90% बचत📊 2kW | 3kW | 5kW उपलब्ध
✔️ Free Site Visit✔️ Net Metering पूर्ण मदत
📞 9856204040👉 आजच संपर्क करा!


दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, नागरिकांनी लाच मागणीबाबत तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 कारवाईतील अधिकारी

या सापळा कारवाईत खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला  निरीक्षक सुनील पाटील, हवालदार गणेश ताटे,  हवालदार निलेश राजपुरे,  कॉन्स्टेबल विक्रमसिंह कणसे,  कॉन्स्टेबल सत्यम थोरात, कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे, चालक हवालदार महेश पुजारी. तपास अधिकारी : निरीक्षक सुप्रिया गावडे, परिवेक्षण : उपअधीक्षक राजेश वाघमारे

मार्गदर्शन : अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर  अधीक्षक अर्जुन भोसले

Post a Comment

0 Comments