Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव येथे रविवारी रात्री ‘इतिहासाचा जागर’ कार्यक्रम; जयराम स्वामी मठात रात्रभर उपक्रम

 


वडगाव (ता. खटाव) (सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क): सदगुरु श्री जयराम स्वामी मठ, वडगाव येथे ‘इतिहासाचा जागर’ हा विशेष कार्यक्रम रविवारी, २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

छत्रपतींच्या राजाश्रयाने समृद्ध झालेला तसेच सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या संरक्षणाखाली सुरक्षित राहिलेला हा मठ ऐतिहासिक व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. सतरावे-अठरावे शतकातील सिद्धयोगींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या ठिकाणी मराठा शैलीतील दुर्मिळ भित्तीचित्रे आढळतात. महाराष्ट्राच्या संत परंपरा व ऐतिहासिक घडामोडींमध्ये या मठाचे विशेष योगदान मानले जाते.

या कार्यक्रमात इतिहास, अध्यात्म व परंपरेचा जागर घडवण्यावर भर देण्यात येणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठान, सातारा व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संपर्क: ह.भ.प. विठ्ठलबुवा गोसावी इनामदार – ९८८१६७६१२१, राहुल जाधव – ९०२८८९८५५५.

Post a Comment

0 Comments