Ticker

6/recent/ticker-posts

नुने येथील युवकाची तामजाईनगरला युवकाची आत्महत्या

सत्य सह्याद्री/सातारा

तामजाईनगर येथील अनिमेश अजय चव्हाण (वय १८, रा. अनुसया रेसिडेन्सी, तामजाईनगर, मूळ रा. नुने) याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. नेमके कारण समजू शकले नाही. दि. १५ रोजी सांयाकाळी साडेचारच्या सुमारास घरातील स्लॅबच्या हुकाला काळ्या रंगाच्या दोरीने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत तो आढळून आला. त्याला त्याचे नातेवाईक मंगेश सपकाळे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,उपचारापूर्वीच  त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  याप्रकरणी डॉ. अनुजा प्रमोद यांनी वर्दी दिली असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. 

Post a Comment

0 Comments