सत्य सह्याद्री/फलटण
साखरवाडी, ता. फलटण येथील चौदामोरी जवळ असलेल्या विहीरीत बुडून महादेव गणपत धोत्रे (वय ४६, रा. साखरवाडी) यांचा मृत्यू झाला. दि. १५ रोजी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास घरातून उसाला पाणी देण्यासाठी जातो, असे सांगून ते गेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर पोलीस पाटील व पोलिसांना बोलावण्यात आले. व नागरिकांच्या मदतीने मृतदेह वर काढण्यात आला. याप्रकरणी मयुर नामदेव धोत्रे (वय ३०) यांनी वर्दी दिली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

0 Comments