आंदोलनादरम्यान “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू नका” अशा घोषणा देण्यात आल्या. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकट वाचन लेक लाडकी अभियानाच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी केले. या वाचनातून शिवाजी महाराजांच्या विचारांचा लोकाभिमुख व व्यापक दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला.
यावेळी वक्त्यांनी आमदार गायकवाड यांनी वापरलेल्या अश्लाघ्य भाषेचा व दिलेल्या धमक्यांचा तीव्र निषेध करत लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारची विधाने लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशांत आंबी यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे तसेच आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात अॅड. वर्षा देशपांडे, वसंत नलावडे, विजय मांडके, गणेश भिसे, सादिक बागवान, श्री. जंगम, कॉ. सर्जेराव भुजबळ, माणिक अवघडे, आनंदी अवघडे, कॉ. सलीम आतार, प्रमोद परामणे, प्रा. आनंद साठे, भगवान अवघडे, उदय चव्हाण, मीना सय्यद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपस्थितांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखण्याचे आवाहन करत धमकीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

0 Comments