जावली तालुक्यातील म्हसवे येथील विक्रात वसंत शिर्के यांना व्याजाने दिलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून त्यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी फलटण तालुक्यातील मुळीकवाडी येथील चौंघणवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील दोघांना अटक केली असून त्यांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली तलवार,बंदूक व बोलेरो जीप पोलिसांनी हस्तगत केली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसवे ता जावली येथील विक्रात वसंत शिर्के यांना फलटण तालुक्यातील मुळीकवाडी येथील निलेश बाळासाहेब मोहिते याने सात टक्के व्याजाने आठ लाख रुपये दिले होते त्याचे डिसेंबर 2014 ते सप्टेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत विक्रात यांनी साडेतीन लाख रुपये व्याज मोहिते यांना दिले आहे तरी सुद्धा निलेश बाळासाहेब मोहिते वय 33,बाळासाहेब दादू मोहिते वय 60,जयश्री बाळासाहेब मोहिते वय 50,रमेश तानाजी जाधव वय 30 व निलेशचा अजून एक मित्र यांनी 323 ऑगस्ट 2017 रोजी विक्रात शिर्के यांना म्हसवे येथून बोलेरो जीप क्र MH-11AW 9579 मधून जबरदस्तीने जीवे मारण्याच्या उद्देशाने पळवून नेले
प्रवासादरम्यान जीपमध्ये विक्रात यांचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला मुळीकवाडी येथे घरी नेऊन डाआंबून ठेऊन मारहाण केली व व्याज आणि मुद्दल मिळून 33 लाख दे नाहीतर तुझ्या मालकीची तीन एकर जमीन निलेशच्या नावावर करुन दे अस म्हणून दमदाटी केली व विक्रात यांच्या मानेवर तलवार ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद विक्रात यांनी मेढा पोलिसात दिली आहे
त्यानुसार गुन्हा दाखल होताच सपोनि जीवन माने यांनी ठाण्यात पोलीस कर्मचारी कमी असल्याने स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन मुळीकवाडी येथे जाऊन सावकारीतल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या निलेश,बाळासाहेब,जयश्री,व तानाजी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तसेच घराची झडती घेतली असता गुन्ह्यात वापरलेली एक तलवार व बोलेरो जीप हस्तगत केली याशिवाय एक बंदूकही मिळून आली पोलीस ठाण्यात आणल्यावर चौकशी करून निलेश बाळासाहेब मोहिते व रमेश तानाजी जाधव यांना अटक केली बाळासाहेब मोहिते व जयश्री मोहिते यांनी प्रकृती अस्वस्थता मुळे अटक करण्यात आली नाही
दोन्ही आरोपीना न्यायालयाने 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे निलेश हा बीएसएफ चा जवान आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन माने,स्थागुशाचे उपनिरीक्षक विकास जाधव,सहा फौजदार सुरेंद्र पाणसांडे, मानसिंग शिंदे, मेढा पोलीस ठाण्याचे संजय शिर्के,नितीन पवार, मीना राऊत,संजय काळे,स्थागुशाचे मोहन घोरपडे,उत्तम दबडे, संजय जाधव, रवी वाघमारे, मारुती लाटणे यांनी कारवाईत भाग घेतला

0 Comments