Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा, अनुप शहांचा आरोप


फलटण नगर परिषद भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. हा सर्व भ्रष्टाचार पुराव्यााजनशी बाहेर काढण्याबरोबरच वेळ प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनुप शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिला
पालिकेत काम करत असताना सत्ताधारी गटाचा स्विकृत नगरसेवक असलो तरी सर्वसामान्यांचा नगरसेवक म्हणूनच काम करत आहे व करत राहणार. सत्ताधारी गटात असलो तरी सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्यास आपण त्यााजवरोधात आवाज उठवरणारच, असे शहा यांनी यावेळी सांगितले
जी कामे झाली नाहीत अथवा पूर्वीच झाली आहेत अशा कामांची बिले मुख्यााजधकार्‍यांनी अदा केली आहेत. मुख्याधिकार्‍यांच्या या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात आवाज उठवणार आहे.
फलटण नगरपााजलकेचे मुख्यााजधकारी हे जनतेचा पैसा त्यांना हवा तसा व हवा त्या पद्धतीने वापरत आहेत. आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच ठेके देण्याचे उद्योग सुरु आहेत. सर्वसामान्य जनतेची पााजलका प्रशासनाकडून सुरु असलेली ही फसवणूक थांबवून फलटणच्या सर्वसामान्य जनतेचा पैसा जनतेच्या सोयीसाठीच व फलटणच्या ाजवकासासाठीच वापरु देणार असल्याचे शहा यांनी सांगितले
संगणकीय नोंदणीत भरमसाठ चुका झाल्या असल्याचे सांगून अनेकांना गतवर्षीचा संकाजलत कर भरुनही तो चालू वर्षीच्या संकाजलत कराच्या देयकामध्ये थकबाकी म्हणून आलेला आहे. नागरीकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना याबाबत संगणकीय चूक असल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात  येत असल्याचे शहा यांनी सांगितले.
आपल्या मर्जीतीलच ठेकेदाराला ठेका देवून त्या ठेकेची बील लवकरात लवकर प्रात करुन त्यातील टक्केवारी घेऊन ते लगेच अदा करण्यात येते. परंतु, विकास कामांबाबत मुख्यााजधकार्‍याकडे बोलण्यासाठी वेळ नसतो,असे शहा यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेत महापुरुषांचे फोटो एका कोनाड्यात गेले अनेक दिवस धूळ खात पडले असून याबाबत मुख्यााजधकारी व पााजलका प्रशासन कसलेच लक्ष देत नाही. मुख्याधिकार्‍यांच्या दालनात नगरसेवक गेले असता त्यांचा अपमान केला जातो, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
फलटण नगरपालिकेमध्ये मुरुम खरेदी करु नये, असा ठराव झाला असताना प्रशासनाने त्यांच्या सोयीसाठी काही ठरााजवक ठेकेदारांकडून मुरुम खरेदी केला असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, प्लास्टिक खुर्च्या 3 रु भाड्याने ाजमळत असताना त्या 10 रु भाड्याने घेतल्या जातात जनतेच्या पैशाचा  वारेमाप खर्च होत आहे
माजी नगराध्यक्ष रघुनाथराजेंच्या विविध विकासकामाबाबत आदेशालाही मुख्याधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली आहे. जर रघुनाथराजेंचे मुख्याधिकारी ऐकत नाहीत तर सर्वसामान्य जनेतेचे गार्‍हाणे मुख्याधिकारी कसे ऐकतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या फलटण नगरपालिकेच्या नूतन इमारतीला गेल्या काही दिवसापासून गळती लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दोन वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीला गळती कशी लागू शकते ? दोन कोटी रुपये खर्च करुनही इमारत भक्कम झाली नसल्याचे शहा यांनी साांजगतले. शहरात संकाजलत कराच्या वसुलीची कारवाई करत असताना बड्या धेंड्यांच्या थकबाकीबद्दल कोणच बोलायला तयार नाही, मात्र गाजरबाची थकबाकी असल्यास त्याचे मात्र नळकनेक्शन लगेच कट केले जाते, असेही सांगीतले.
प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आवाज उठवत असताना प्रंसंगी आपण राष्टीय काँग्रेसची मदत घ्यायलाही मागं - पुढं बघणार नाही यापुढे सातत्याने भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठविणार आहेच. पण, वेळप्रसंगी न्यायालयात ही जाण्यास मागे पुढे पाहणार नाही माझा लढा सर्वसामान्यांसाठी सुरु असून कोणत्याही परिस्थितीत स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments