जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलीसमवेत मुख्याध्यापक पोपट मिंड क्रीडा शिक्षक श्रीनिवास चव्हाण .
मायणी:- (वार्ताहर)
कमळेश्वर विद्यामंदिर विखळे शाळेच्या पाच विद्यार्थिनींची जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली.
जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा मायणी येथील भारतमाता विद्यालय येथे संपन्न झाल्या. यामध्ये कमळेश्वर विद्यामंदिर शाळेच्या पाच विद्यार्थिनी यशस्वी झाल्या.३८किलो वजन गटात वैष्णवी देशमुख,४३किलो वजन गटात संजली शिंदे,४५किलो वजन गटात चांदणी धुमाळ,४९किलो वजन गटात दिपाली कुंभार,५२किलो वजन गटात पायल निकम या विद्यार्थिनी तालुका स्तरावर अजिंक्य ठरल्या. त्यांची निवड सातारा येथे होणाऱ्या जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक श्रीनिवास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यर्थिंनी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, संस्थेचे संचालक, विखळे गावचे सरपंच राम देशमुख, उपसरपंच श्रीकांत देशमुख ,मुख्याध्यापक पोपट मिंड, ग्रामस्थ, शिक्षकांनी अभिनंदन केले.

0 Comments