मायणी:-
देशात नवरात्रीचा उसत्व भक्तिमय वातावरनात सुरू असताना,मायणीमध्ये मात्र वीजेचा लपंडाव सुरू आहे.त्यामुळे भविकांसह नागरिकांना याचा त्रास होत आहे.
मायणी व परिसरात असंख्य सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळे आहेत. आणि प्रत्येक मंडळाचा काहींना काही उपक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम,दांडिया रात्रीच्या वेळेत असतो,पण वीजच नसल्याने या कार्यक्रमांना फटका बसत आहे.त्यामुळे मंडळाच्या सदस्यासह भाविकांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.
ऐन उस्तवामध्ये वीज गायब होण्याचा प्रकार मायनीकरांसाठी नवीन नाही.महावितरण कार्यालयात लोकांनी विचारपूस केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात,या ढिसाळ कामानिमित्त मायनीतील नागरिक महावितरणच्या पराक्रमाबद्दल रोष व्यक्त करीत आहे.

0 Comments