सातारा- महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेमार्फत नागरपुर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 11 कास्य पदके अशी 24 पदकांची कमाई करुन राज्यात दुसरे स्थान पटकावले. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अकॅडमीमुळे सातारा जिल्ह्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे. भविष्यात अकॅडमीचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे आयबा प्रशिक्षक सागर जगताप, अकॅडमीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, रविंद्र होले, डॉ. शिंदे, दौलत भोसले, संजय पवार, विनोद राठोड, मयुर दिघे यांच्यासह पालक उपस्थित होते. विविध वजनगटात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या अथर्व भोसले, ओम कदम आणि ओम गाढवे यांनी सुवर्ण पदक, आदिती कदम, समिक्षा होले, उत्कर्षा पवार, रिषिका होले, मृणाल जाधव, तृप्ती काकडे, यासर मुलाणी, विक्रम कर्डिले, जय चव्हाण, श्रावणी यादव यांनी रौप्य तर, श्रावणी भोसले, चैत्राली पवार, अक्षता जाधव, सुमित घाडगे, पार्थ ढोणे, शंभुराज गाढवे, ओमकुमार फरांदे, साईराज चव्हाण, राजवर्धन शिंदे, अमितेश गायकवाड, ओम घोरपडे या खेळाडूंनी कांस्य पदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्या तीन खेळाडूंची पश्चिम विभागा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments