Ticker

6/recent/ticker-posts

शितोळेनगर येथे दि. 4 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान 2 लाखाची प्रथम कुस्ती


निमसोड
शितोळेनगर (निमसोड) ता. खटाव येथे शनिवार दि. 4 ऑक्टोंबर रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. माजी सरपंच कै. पै. आप्पासाहेब भागोजी शितोळे (सरकार) यांच्या स्मरणार्थ या मैदानाचे आयोजन केले आहे. या मैदानात संसदीय कार्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत प्रथम क्रमांकाची कुस्ती जोडण्यात येणार असल्याची माहिती संयोजक व बेंगलोर मराठा बुलियन रिफायनरी असोसिएशनचे सचिव विजयशेठ शितोळे, माजी सरपंच सुभाषराव शितोळे यांनी दिली.
मोतिबाग तालमीचा विजय धुमाळ व पुणे येथील काका पवार तालमीचा गोकुळ आवारे यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची 2 लाख 10 हजार इनामाची कुस्ती होणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या 1 लाख 51 हजार इनामासाठी अकलूज येथील शिवनेरी तालमीचा उमेश शिरतोडे व पुणे येथील सह्याद्री क्रिडा संकुलाचा अतिश मोरे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तृतीय क्रमांकासाठी सह्याद्री क्रिडा संकुलाचा विशाल शिंदे विरुध्द मुरगुड तालमीचा सोन्या सोनटक्के यांच्यामध्ये 51 हजार रुपयांची कुस्ती होणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी सांगलीचा न्यु तालमीचा रामदास पवार व शिवनेरी तालमीचा योगेश शेळके यांची 25 हजार इनामासाठी झुंज होणार आहे. अन्य कुस्त्या दुपारी 12 ते 2 या वेळेत अंबवडे-निमसोड रस्त्यावरील स्व. शितोळे यांच्या समाधी शेजारी जोडण्यात येणार आहेत. मैदानासाठी मंत्री बापट यांच्यासह आ. जयकुमार गोरे, पंचायत समितीचे सभापती संदिप मांडवे, जि. प. सदस्य दिपक पवार, युवा नेते काकासाहेब मोरे, राज शेडगे, रावसाहेब मगर, धनाजी फडतरे, विकास जाधव, गोरख सरक आदिंसह मान्यवर स्थानिक ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे. अकलुज येथील युवराज केचे कुस्त्यांचे धावते समालोचन करणार आहेत. तर इंदापूर येथील युवा हलगी ग्रुपचे हलगीवादन होणार आहे. परीसरातील कुस्ती शौकिनांनी मैदानाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments