म्हसवड (धनंजय पानसांडे)
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ,लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीयांच्या संपूर्ण एक महिना चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरु असे दीवाळी पाडवा ते तुलसी विवाह या12 दिवसाच्या दरम्यान परंपारिक पद्धतीने व पूर्वापार चालत आलेले "उभ्या नवरात्रा"चेअतिशय कडक व्रत सध्या सिद्धनाथ मंदिरात सुरु झाले आहे.
म्हसवड येथील माणगंगेच्या तिरावर दहाव्या शतकातील अत्यंत प्राचिन असे हेमाडपंथी मंदीर उभे आहे.,तेव्हापासून आज अखेर या मंदिरात परंपरागत चालत आलेल्या अनेक धार्मिक उपासना व अत्यंत कडक अशा व्रतांची अखंड आणि अव्याहत प्रथा अत्यंत मनोभावे सुरु असून"उभे नवरात्र"ही अत्त कडक आणि कठीण अशी उपासना आहे.
अनेक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अराध्य दैवत असलेल्या येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीदेवतांचा पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरेनुसार हळदी-विवाह-आणि वरात या मंगल विवाहाच्या पयऱ्या आहेत त्यानुसारच श्रींचा तब्बल एक महिना चालणारा विवाह सोहळा अनेक धार्मिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो.
या एक महिन्याच्या विवाहसोहळ्यातील सर्वात महत्वाचे व मुख्य असे हे 12 दिवस समजले जातात. कार्तिक शु.प्रतिपदा (दीपावली पाडवा)ते कार्तिक शु. प्रतिपदा(तुलसी विवाह) दरम्यान, दिवाळी पाडव्यादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी -सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते,या घटस्थापनेच्या दिवसापासून श्रींचे 12 दिवसांचे नवरात्राचे उपवास सुरु होतात.12 दिवसानंतर तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता हे घट उठविले जातात.त्यावेळी 12 दिवसाच्या नवरात्राची सांगता होते

0 Comments