Hot Posts

6/recent/ticker-posts

खटाव येथे दि. 1 रोजी राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा


खटाव
येथे बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने आमदार फंड, जिल्हा परिषद, पंचायत समिती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते यांनी दिली.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. लोकार्पन होणार्‍या कार्यक्रमामध्ये खटाव ग्राम सचिवालय, अंतर्गत रस्ते डांबरीकरण - काँक्रीटीकरण, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, लोणी रस्त्यावरील येरळा नदीपुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिस्तंभ, जिल्हा बँक शाखा कार्यालय उद्घाटन या कामांचा समावेश आहे. यावेळी कोरेगांवचे आमदार शशिकांत शिंदे, खटाव-माणचे नेते माजी आमदार प्रभाकर घार्गे, आ. शिंवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. नरेंद्र पाटील, आ. दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, विक्रमसिंह पाटणकर, शेखरभाऊ गोरे, सुनिल माने, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, वसंतराव मानकुमरे, शिवाजी सर्वगोड, सभापती संदिप मांडवे, राजेश पवार, मनोज पवार, वनिता गोरे, कैलास घाडगे आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी खटाव व कोरेगांव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments