स्वाभिमानी शेतकरी संघटनेने* आज कराड शहर प्रांत कार्यालयात *शिमगा आंदोलन* करत "शासनाची दिवाळी आणि शेतकऱ्यांचा शिमगा" अशा घोषणा देत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला.
संघटनेचे कराड तालुका चे प्रमुख विकास पाटील ह्यांनी ऐन दिवाळी सणात शासनाने शेतकऱ्यांचं दिवाळ काढायचा आणखी एक प्रयत्न केला आहे असे ताशेरे ओढत पुढे ते म्हणाले की आधीच नैसर्गिक आपत्ती जास्त प्रमाणात असताना अवकाळी पावसाने वाया गेलेल्या सोयाबीन पिकामुळे शेतकरी संपूर्णतः त्रस्त हतबल झाला आहे आणि तो भिकेला लागला आहे. तोंडावर आलेला दिवाळी सण आता कसा साजरा करायचा ह्याच चिंतेत शेतकरी आहेत. शासनाने हमीभाव जाहीर करुनही व्यापारी वर्ग अजूनही सतत का शेतकऱ्यांची लूट करतायत. त्यास जबाबदार कोण असा सवाल त्यांनी प्रशासनास विचारला आहे? हमीभाव मिळालाच पाहिजे, हमीभाव केंद्रे प्रत्येक ठिकाणी चालू करावीत तसेच हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यावरती कारवाई व्हावी अन्यथा ह्यापुढील आंदोलन हे मंत्र्यांच्या घरासमोर केले जाईल असं त्यांनी प्रतिपादन केल आहे. आजच्या आंदोलनास कराड तालुका संभाजी ब्रिगेड संघटना तालुकाध्यक्ष शिवश्री शैलेश मोरे, भूषण पाटील, विनोद डुबल, विक्रम थोरात उपस्थित होते तसेच RPI संघटनेनेही जाहीर पाठींबा दिला आहे. त्याचप्रमाणे आंदोलनास शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

0 Comments