म्हसवड (धनंजय पानसांडे)
माणदेशी संचलित म्हसवड येथील माणदेशी क्रिडा संकुलनात प्रशिक्षण घेत असलेले “माण देशी चॅम्पियन्सचे चार खेळाडू राज्य स्तरावर चमकले”
नागपूर येथेनुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय अटलांटिक्स मैदानीखेळाच्यस्पर्धेमध्ये माणदेशी चॅम्पियन्सची खेळाडू पूनम काळेल हिने "ट्रिपल जपं "या खेळामध्ये ११. ४३ मी. लांब उडी टाकून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच वैष्णवी सावंत हिने लांब उडी मध्ये ५. ७ मी . लांब उडीमारून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.त्याचबरोबर माणदेशी चॅम्पियन्सचे खेळाडू सचिन कोळेकर यांची महाराष्ट्राच्या यु-१७ हॉकीच्या कर्णधार पदी निवड झाली. कुस्तीमध्ये विशाल कोकरे याची ९७ कि.वजनगटात ऑल इंडियाला निवड झाली आहेया सर्व खेळाडूंना प्रशिक्षक महालिंग खांडेकर (एन आय एस ) ,प्रशिक्षक मारुती लोखंडे व समन्वयक मंगेश काटकर यांचे मार्गदर्शन लाभले .


नागपुर येथील क्रिडा स्पर्धेत पुनम काळेल व वैष्णवी सावंत हिने संपादन केलेले यश व यासह सचिन कोळेकर,विशाल कोकरे हे खेळाडु राज्य स्तरावर चमकल्या बाबत माणदेशी फौंडेशनच्या संख्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा,विजय सिन्हा,माण देशी चॅम्पियन्सचे प्रभात सिन्हा,प्रशिक्षक महालिंग खांडेकर (एन आय एस ), मारुती लोखंडे व सहकारी क्रिडा प्रशिक्षक, समन्वयक मंगेश काटकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
वैष्णवी सावंत चा अमेरिकेत झेंडा
माण देशी फौंडेशनच्या सहयोगातुन मुंबईतील मरिनलाईन येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे "स्प्रिंटर क्लब" मध्ये वैष्णवी सावंत हिस लॉंग जंप व पूनम काळेल हिस ट्रिपल जंप खेळाचे प्रशिक्षण अमेरिकेतील वर्जिनिया स्टेट मधील लेक ब्रेडॉक स्कुल युनिर्व्ह्रसिटी चे नामांकित कोच ओरेगन एस्सार वॉर्ड यांनी पूनम काळेल व वैष्णवी सावंत यांना १८ दिवसाचे क्रिडा प्रशिक्षण दिले.व त्यानंतर अमेरिकेतील वर्जीनिया ऑल स्टेट चॅंपियन्सिप क्रिडा स्पर्धेत अडीच हजार मिटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याची संधी पूनम काळेल व वैष्णवी सावंत यांना देण्यात आली.या स्पर्धेत वैष्णवी सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावुन माणदेशी चॅंपियनचा अमेरिकेत झेंडा फडकाविला होता.
0 Comments