पाटण (संजय कांबळे)
पाटण तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या एकूण ४० सरपंच व२८६ सदस्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पाटणचे आमदार मा. शंभुराजे देसाई यांच्या हस्ते सरपंच व सदस्यांना भगवे फेटे बांधून व वह्या वाटप करण्यात आले. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर या ठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा. अशोकराव पाटील, माजी चेअरमन मा.डाॅ दिलीपराव चव्हाण, शिवदौलत बँकेचे चेअरमन मा.अॅड मिलिंद पाटील,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा जयवंतराव शेलार,पंचायत समितीचे गटनेते मा.पंजाबराव देसाई,हरिष भोमकर,डि.आर.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला विविध गावचे सरपंच सदस्य कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.
0 Comments