म्हसवड (धनंजय पानसांडे)
गेल्या वर्षी शिवजयंती निमित्ताने शहरातील चौपदरी करणाच्या मध्यभागी पालिकेने उभारलेल्या लाईटच्या पोलला झेंडा लावताना शाँक लागून मृत्यू झालेला शिवसैनिक आकाश( दत्ता)मोहन देवकर यास शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख मा.नितिन बानुगडे-पाटील यांच्या सहकार्याने व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.विजयबापू शिवतारे,मा.रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्ना मुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून एक लाख रूपये मयत देवकर यांच्या वडिलांना नुकतेच मंजुर झाले असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख राहूल मंगरूळे यांनी सांगितले.
या बाबत मंगरूळे म्हणाले गेल्या वर्षी १ मे २०१६ रोजी शिवजयंती निमित्ताने शहरात शिवभक्तांसह शिवसैनिक भगवे झेंडे लावत होते बांधकाम विभागाने शहरात दिड किलो मिटरचा चौपदरीकरण रस्ता रुंद केला होता त्या रस्त्याच्या मध्य भागी दुभाजक उभे केले होते त्या दुभाजका मध्ये पालिकेने आकर्षक अशी लाईटचे पोल उभे केले होते त्या मुळे शहराला वेगळेपण आले होते माञ त्या लाईटच्या काही पोलला शाँक लागत होता या बाबतची माहिती पालिकेला कर्मचारी व नागरिकांनी देवून हि पालिकेने दुर्लक्ष केले या दुर्लक्षाचा बळी अखेर आकाश देवकर ठरला होता. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ऐन २१वर्षात गेल्याने आई वडिलांचा संभाळ करणारा वा कमावती व्यक्ती गेल्याने आकाश याचे आई वडिल उपास पोटी आपले जिवन जगत होते शिवसेनेचे शहर अध्यक्ष राहुल मंगरूळे तसेच युवासेनेचे शहराध्यक्ष सोमनाथ कवी यांनी गेले एक वर्ष याचा पाठपुरावा केल्या नंतर काल देवकर कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन एक लाख रूपये मंजुर झाल्याचे कळाले असुन या कामी पालकमंञी विजयबापू शिवतारे यांनी प्रयत्न केल्याची माहिती मंगरूळे यांनी दिली
0 Comments